गुरुवार, ७ मार्च, २०२४

नेट / सेट परीक्षेविषयी थोडेसे.

 

परीक्षेविषयी थोडेसे........ 

Ø नेट / से म्हणजे काय ?

विद्यापीठ अनुदान आयोगाने वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठांमधील प्राध्यापक व्याख्याते यांना चौच्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना या पदावर होणा-या नवीन नियुक्तीकरिता आवश्यक किमान पात्रतेबरोबरच आयोगाद्वार घेतल्या जाणाच्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अट घातली.

दरवषीं वर्षातून दोनवेळा विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) बिगर विज्ञान विषयांसाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (National Eligibility Test - NET) आयोजन करते. पूर्वी या परीक्षेचे नाव राष्ट्रीय शैक्षणिक परीक्षा (National Education Test - NET) अम हात पण नंतर ते बदलून राष्ट्रीय पात्रता परीक्षा असे करण्यात आले. विज्ञान विषयांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ (CSIR) हे दोन्ही संयुक्तरित्या परीक्षेचे आयोजन करतात.

पहिली नेट परीक्षा ही १९८९ साली घेण्यात आली. तेव्हापासून सातत्याने आयोगाद्वारे या परीक्षा देण्यात येतात उमेदवाराच्या वाढत्या संख्येचा विचार करून रेटच्या परीक्षेील ताण कमी करण्याकरिता विद्याथ्यांना स्वतःच्या मातृभाषेत / राज्याच्या भाषेत परीक्षा देता याची म्हणून राज्यस्तरीय पात्रता परीक्षा घेण्याचा पर्याय सुरु करण्यात आला. १९९० मध्ये यु.जी.सी ने यू-बैट (UGC Committee on Accredi tation of Test-U-CAI) ची स्थापना केली. या समितीच्या शिफारशीनुसार राज्यस्तरीय परीक्षा ही राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या धतींवर असल राज्यसरकार ही परीक्षा घेण्यासादी योग्य विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेची नियुक्ती करते. सध्या महाराष्ट्र व गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यासाठी स्वतंत्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा घेतली जाते.

सेट परीक्षा घेणाऱ्या राज्यांच्या कार्याची पाहणी आयोगाच्या अधिस्वीकृती समिती (Accreditation Committee) तर्फे वेळोवळी केली जाते. त्या समितीच्या अहवालावर आधारित अंतिम निर्णय आयोगाद्वार घेतला जातो. महाराष्ट्रामध्ये १९९४ साली पुणे विद्यापीठाला राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे (SET) आयोजन करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. त्यानुसार १९९५ पासून सातत्याने पुणे विद्यापीठ सेट परीक्षेचे आयोजन करत आहे.


Ø परीक्षेचा हेतू

परीक्षा देणारे उमेदवार में पदव्युत्तर पातळीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असल्यामुळे त्या विषयातील पारंगत असतात. परंतु परीणामकारक शिक्षण कार्य करण्यासाठी त्यांची बौद्धिक क्षमता योग्य आहे का नाही, याचा शोध घेण्यासाठी आयोग ही परीक्षा घेते, या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराचे विषयज्ञान व सर्वसामान्य बौद्धिक क्षमतेची चाचणी घेतली जाते.

नेट परीक्षेत पात्र व यशस्वी उमेदवारांपैकी काहींना शिष्यवृत्ती दिली जाते व इतरांना प्राध्यापकपदाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र दिले जाते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले उमेदवारसुद्धा व्याख्याता म्हणून कार्य करू शकतात परंतू अशा परिस्थितीत त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकत नाही. मेसेट परीक्षेत मात्र शिष्यवृत्तीसाठी कोणतीही तरतूद नाही.


Ø किमान पात्रता

नेट / सेट परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे, ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण झाले असेल त्याच विषयाची परीक्षा देता येते. उदा. जर विद्यार्थी एम.कॉम. असेल तर तो कॉमर्स या विषयाची परीक्षा देऊ शकतो,

पदव्युत्तर शिक्षणाच्या द्वितीय वर्गात शिकणारेसुद्धा परीक्षा देऊ शकतात, पण जर ते ही परीक्षा उत्तीर्ण झाले तर मात्र त्याचे प्रमाणपत्र त्यांना लगेच मिळत नाही. पदव्युत्तर परीक्षेच्या निकालाची प्रत जमा केल्यानंतरच नेट / सेट उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्यांना मिळते. अशा विद्याच्याँनी नेट परीक्षेचा निकाल लागल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीत पदव्युलर परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांचा नेट परीक्षेचा निकाल रह होऊ शकतो.

पदव्युत्तर परीक्षेत दोन्ही वर्षाच्या गुणाची बेरीज ही किमान ५५% (प्रेस किंवा राऊडिंग ऑफ न होना) असेल तर तो उमेदवार परीक्षेस पात्र ठरतो, राखीव प्रवर्गातील अपंग उमेदवारांसाठी किमान ५०% गुण आवश्यक आहेत.


Ø परीक्षेतून सूट

१. दि. २७ फेब्रुवारी १९८९ पूर्वी नियुक्त झालेले.

२ दि. २७ फेब्रुवारी १९८९ ते ३१ मार्च १९९० या काळात नियुक्त झालेले आणि शासकीय ठराव दि. २७-२-८९ मध्ये दिलेली शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे.

३. दि. ३१ डिसेंबर १९९३ पूर्वी एम.फील पास असणारे.

४. विद्यापीठ अनुदान आयोग (पीएच. डी. पदवी करीता किमान दर्जा व प्रक्रिया) अधिनियम २००९ नूसार पीएच. डी. पदवी प्राप्त व्यक्ती.

    महाविद्यालय व विद्यापीठामध्ये अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती करिता नेट/सेट अनिवार्यच आहे. त्यामुळे बरिष्ठ अधिव्याख्याता पदासाठी या परीक्षेशिवाय गत्यंतर नाही. म्हणून परीक्षेला नुसता विरोध करत व टीका करत राहण्यापेक्षा अभ्यासात वेळ घालून परीक्षेची तयारी करणे श्रेयस्कर आहे.

Ø वयोमर्यादा

नेट परीक्षेतील कनिष्ठ शोध शिष्यवृत्तीसाठी (JRF) उमेदवाराचे वय ३० पेक्षा जास्त असता कामा नये. एस.सी./एस.टी/ओबीसी/ अपंग प्रवर्गातील व्यक्ती व स्त्रियांकरिता यामध्ये ५ वर्षांची सूट दिली आहे. याशिवाय उमेदवाराच्या पदव्युत्तर विषयाशी संबंधीत संशोधन अनुभव असल्यास जास्तीत-जास्त पाच वर्षांपर्यत सूट देता येते. एल. एल. एम. पदवीधारकांना तीन वर्षांची सूट आहे. तथापि, कोणत्याही परिस्थितीत एकूण सूट पाच वर्षांपेक्षा अधीक असणार नाही.

नेट / सेट परीक्षेतील प्राध्यापकासाठी पात्रता परीक्षेस कुठलीही वयोमर्यादा नाही. उमेदवार कोणत्याही वय वर्षांपर्यंत ही परीक्षा देऊ शकतो.


Ø सेट परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (Setexam.unipune.ac.in.) प्रवेश अर्ज उपलब्ध असतो. ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट आऊट घ्यावी लागते.

१. परीक्षेच्या तारखा, पात्रता व इतर माहिती काळजीपूर्वक वाचा.

२. स्वतःचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ (जास्तीत जास्त ५० केबी आकाराचा व. जेपीइजी फॉरमॅट मध्ये) व सही (जास्तीत जास्त         ३० केबी व जेपीइजी फॉरमॅट मध्ये) स्कॅन करा, स्कॅन केलेली प्रत पेन ड्राईव्ह अथवा सीडी मध्ये ठेवा.

३- संकेतस्थळावर Apply पर्यायामध्ये जाऊन 'New user' मध्ये माहिती भरा, तेथील माहिती भरल्यास User Name (E-mail-ID) a Password मिळेल. या दोन्हींची नोंद करून ठेवा.

४. User Name a Password वापर करून Registered User मधील ऑनलाईन प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरा व 'Submit' या बटनावर क्लिक करा. फोटोची व सहीची स्कॅन प्रत अपलोड करा. प्रवेश अर्जातील माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास Update Form या बटनावर क्लिक करा. प्रवेश अर्जातील माहिती अचूक असेल तर Print the form या बटनावर क्लिक करा. संगणकावरील Unique Application Number लिहून घ्या, प्रवेश अर्जाची Print out घ्या.

5. बँकेत पैसे भरणे - बँक चलनाची प्रत घेवून बँकेत शुल्क भरावे, शुल्क पावतीची एक प्रत क्तलेछ ख' तदृणइज्ञ.

६. प्रवेश अर्ज जतन करणे छापील प्रवेश अर्ज जपून ठेवा. अर्ज पुणे विद्यापीठाकडे अथवा संबंधीत परीक्षा केंद्रात पाठवू नये.

७. ऑनलाईन प्रवेशपत्र आपला प्रवेश अर्ज वैद्य ठरला तर परिक्षेच्या १० दिवसांपूर्वी ऑन लाईन प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिला जातो. User Name Password वापरून प्रवेशपत्राची प्रिंट काढावी लागते. पूर्वी सेट परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्र उमेदवाराला पोस्टाने पाठविली जात पण २००९ पासून पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परिक्षेच्या दहा दिवसापूर्वी प्रवेशपत्र उपलब्ध केली जातात. परिक्षेच्या वेळी ही प्रिंट आऊट व एक फोटो ओळखपत्र (उदा.- महाविद्यालयाचे ओळखपत्र, वाहन परवाना इ.) सोबत न्यावे लागते. परिक्षेच्या संबंधीत काही अडचणी असतील तर परिक्षाकेंद्र प्रमुखाशी संपर्क साधावा, अधिक चौकशीसाठी ०२०-२५६९२५२७/२५६०१२८९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


Ø नेट परीक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया

१. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावरून (ugchetonline.in) NTA संकेतस्थळाची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करा. अथवा ugcnetonline.in या संकेतस्थळावर जावे.

२. स्वतःचा पासपोर्ट फोटो व सही स्कॅन करून (JPEG Format, Less than 300 KB) पेन ड्राईव्ह अथवा सीडी मध्ये जवळ ठेवा.

३. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा व त्याची छापील प्रत घ्यावी. अर्ज कोठेही पाठवू नये.

४. परीक्षा शुल्क डेबीट / क्रेडीट कार्डाद्वारे / बँक चलनाद्वारे भरावे.

५. परीक्षेचे ओळखपत्र परीक्षेपूर्वी वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे.


Ø परीक्षा शुल्क

        सेटसाठी आवेदनपत्र शुल्क सप्टेंचर २००९ पासून खुल्या प्रवर्गासाठी रूपये ५५० व एस.सी./एस.टी./डी.टी.एन.टी./ एस.बी.मी./ ओ.बी.सी/व्ही.एच. / पी.एच. प्रवर्गासाठी परीक्षाशुल्क रुपये ४५० इतके आहे. HDFC/Bank of Maharashtra या बँकामध्ये हे शुल्क भरता येते.

सेट परीक्षा ही साधारणतः जानेवारी / फेब्रुवारी व जुलै ऑगस्ट या महिन्यात घेतली जाते. परीक्षेपूर्वी २-३ महिने आधी महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांत जाहिरात येते. नेट परीक्षा ही साधारणतः डिसेंबर व जून या महिन्यात घेतली जाते. रोजगार समाचार (Employment News) या साप्ताहिकात परीक्षेची जाहिरात येते. पूर्वी आवेदनपत्राच्या झेरॉक्स प्रती करून फॉर्म भरता येत होता पण जून २०१० पासून या परीक्षेचे फॉर्म अऑनलाईन भरले जातात. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु.१०००/-, राखीव प्रवर्गासाठी रु.२५०/- व इतर मागासवर्गीयांसाठी रु. ५००/- इतके आहे.


Ø परीक्षेचे विषय

        नेट परीक्षा ही ८४ विषयांमध्ये घेतली जाते तर सेट परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, इतिहास, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, डिफेन्स, गृहविज्ञान, समाजसेवा, लोकप्रशासन, गणित, पर्यावरण शास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूमिती, भूगोल, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी, शिक्षण, शारीरिक शिक्षण, पत्रकारिता आणि जनसंपर्क, ग्रंथालयशास्त्र आणि माहिती विज्ञान, आंतरराष्ट्रीय संबंध (संरक्षणशास्त्रासह) इत्यादी ३२ विषयामध्ये देता येते. उमेदवाराने ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे त्याच विषयाची परीक्षा त्याला देता येते. तथापि एखाद्या पदव्युत्तर पदवीच्या विषयात सेट परीक्षा घेतली जात नसेल तर त्या विषयाशी संबंधीत इतर विषयाची परीक्षा देता येते.

Ø परीक्षा केंद्र

महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या ठिकाणी सेट परीक्षेची केंद्रे आहेत, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नांदेड, अमरावती, सोलापूर, गडचिरोली, अहमदनगर, धुळे व चंद्रपूर अशी महाराष्ट्रातील १४ परीक्षा केंद्रे व गोव्यातील १ मिळून १५ परीक्षा केंद्रातून ही परीक्षा देता येते.

महाराष्ट्रात नेट परीक्षेची ९. केंद्रे आहेत. अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, पुणे


Ø परीक्षेचे माध्यम

सेट ही परीक्षा इंग्रजी किंवा मराठी या दोन माध्यमांतून देता येते तर नेट ही परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी या दोन माध्यमातून देता येते.


Ø परीक्षेचे स्वरूप

सेट व नेट परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णपणे सारखा आहे. फरक इतकाच आहे की सेट ही राज्यस्तरीय तर नेट ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षा आहे. पूर्वी सेट परीक्षा पास होणारे उमेदवार हे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कोठेही अधिव्याख्याता पदासाठी पात्र होते. नंतर युजीसी ने आपल्या धोरणात बदल केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या सेट परीक्षेची मान्यता आता फक्त महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांपुरतीच मर्यादित आहे. २४ फेब्रुवारी २००२ किंवा त्यापूर्वीच्या सेट परीक्षेला हा निर्णय लागू नाही. या पूर्वीच्या सेट परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी भारतभर सेवेस पात्र आहेत.

राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांत मुद्धा त्यांच्या 'सेट' परीक्षा घेतल्या जातात. पण या राज्यांतील 'सेट' उत्तीर्ण विद्यार्थी महाराष्ट्रात सेवेसाठी पात्र धरले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची 'सेट' परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी इतर राज्यांत सेवेसाठी पात्र ठरणार नाहीत.

दुसरा फरक म्हणजे नेटप्रमाणे सेट परीक्षेमध्ये कनिष्ठ शोध शिष्यवृत्ती (JRF) ची तरतूद नाही.

सर्व देशभर एकाच दिवशी घेतल्या जाणाऱ्या नेट परीक्षेत व सर्व महाराष्ट्रात एकाच दिवशी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेत दोन प्रश्रपत्रिका असतात, परीक्षेसाठी चूक उत्तरासाठी गुण वजा करण्याची पद्धत (Negative marking) नाही

१. प्रश्नपत्रिका - 1

ही प्रश्रपत्रिका सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य असते. यामध्ये अध्यापन व संशोधन विषयक अभियोग्यता, भाषाकौशल्य, बौद्धिक चाचण्या वगैरेवर आधारित ५० अनिवार्य वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले असतात, त्यातून एक अचूक पर्याय निवडायचा असतो. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असल्यामुळे एकूण १०० गुणांची ही प्रग्रपत्रिका असते.

२. प्रश्नपत्रिका २

ही प्रश्नपत्रिका उमेदवारांने निवडलेल्या ऐच्छिक विषयांशी संबंधित असते. यामध्ये सुद्धा वरीलप्रमाणेच चार पर्याय, ५० अनिवार्य प्रश्न व १०० गुण असतात.

परीक्षेचे स्वरूप दर्शविणारा तक्ता

पेपर क्र.

स्वरूप

एकूण प्रश्न

एकूण गुण

वेळ

1

सर्वांसाठी अनिवार्य

५० वस्तुनिष्ठ प्रश्न

100

६० मिनिट

2

ऐच्छिक विषय

१०० वस्तुनिष्ट प्रश्न

200

१२० मिनिटे

     केवळ विज्ञान विषयाच्या नेट परीक्षेसाठी जून २०११ पासून नविन परीक्षापद्धती स्वीकारली आहे त्यामध्ये केवळ एक बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यामध्य भाग अ सर्व विषयांसाठी समान (सामान्य विज्ञान व संशोधन अभिक्षमता) असेल, भाग- ब भाग - क संबंधीत विषयाचा असेल. त्याच्या सविस्तर माहितीसाठी CSIR चे संकेतस्थळ पहावे.


Ø कनिष्ठ शोध शिष्यवृत्ती (Junior Research Fellowship)

नेट परीक्षेचा फॉर्म भरताना कनिष्ठ शोध शिष्यवृती (Junior Research Fellowship) चा एक पर्याय असतो. विद्यार्थी हा पर्याय निवडू शकतात, जी. आर. एफ. उत्तीर्ण होणारे विद्यार्थी अधिव्याख्याता पदासाठी सु‌द्धा पात्र असतात. हा पर्याय निवडणाऱ्या व नेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांपैकी गुणवत्तेच्या आधारावर काहींची निवड शिष्यवृत्तीसाठी केली जाते. उमेदवार JRF उत्तीर्ण झाल्यानंतर UGC कडून त्याला पत्र पाठविले जाते. या पत्राच्या तारखेपासून ३ वर्षांपर्यंत JRF ची मुदत असते तथापि, एम.फील./पीएच. डी. पदवी साठी संशोधन सुरू असल्यास उमेदवाराने नेट उत्तीर्ण केल्याची तारीख अथवा संशोधन प्रत्यक्ष सुरू केल्याची तारीख यापैकी जी तारीख नंतर असेल तिथून शिष्यवृत्ती मिळते. विद्यापीठ अनुदान आयोगाने विविध विद्यापीठाना JRF च्या काही जागा वाटून दिलेल्या आहेत. त्यानुसार ही विद्यापीठे JRF उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवितात.

JRF साठीची परीक्षा १९८४ पासून घेतली जाते. पण १९८९ पासून JRF व अधिव्याख्याता पदासाठीची पात्रता परीक्षा दोन्ही एकत्रपणे घेण्यात येतात.

Ø परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान पात्रता

दोन्ही विषयांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाच्या मदतीने केली जाते. या दोन्ही पेपरमध्ये स्वतंत्रपणे किमान गुण मिळविणाऱ्यांनाच उत्तीर्ण घोषीत केले जाते. पूर्वी पेपर ३ मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे किमान गुण हे एका कमिटीद्वारे ठरविले जात होते. दरवेळी त्यांत बदल होत होता, जूलै २०१८ पासून परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खालीलप्रमाणे निकष ठरविण्यात आले आहेत. यावर आधारित निकाल जाहीर केला जातो.

जुलै २०१८ पासून परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष

प्रवर्ग

पेपर १

पेपर 2

साधारण

४० % (४० गुण)

४०% (८० गुण)

शारीरिक दृष्टीने अपंग / एस.सी. / एस.टी. / ओ.बी.सी./तृतीय पंथी

३५ % (३५ गुण)

 

३५.% (७० गुण)

 

     मात्र ऐनवेळी या निकषामध्ये बदल करण्याचा अधिकार युजीसी ने राखून ठेवला आहे.

१. बाजूच्या तक्त्यात दिल्याप्रमाणे प्रत्येक पेपरमध्ये किमान गुण प्राप्त करावे लागतील. सदरील गुण प्राप्त विद्यार्थ्यांची वेगळी यादी केली जाईल.

२. या यादीमधून गुणानुक्रमे विषयनिहाय पहिल्या ६१% विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी बनविली जाईल. प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी वेगळी असेल. हे विद्यार्थी अधिव्याख्याता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र समजले जातील.

३. वरील ६१% विद्यार्थ्यांमधून कनिष्ठ शोध शिष्यवृत्ती (JRF) प्राप्त विद्याथ्यांची वेगळी यादी केली जाईल. अशा प्रकारे जाहीर केलेला निकाल सर्वांना बंधनकारक राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Research Methodology MCQ

  Research Methodology MCQ ज्या संशोधन पद्धतीचा उद्देश अभ्यासाच्या नवीन क्षेत्राचा शोध घेण्याचा आहे जेथे पूर्वी थोडे किंवा कोणतेही संशोधन के...